जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल 5 मिनिटं वेळ काढून फक्त हे वाचा..!
![]() |
1.शिवाय घर अपूर्ण असतं. आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहोत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई-वडिलांचा हात असतो.
2.आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं.आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला.
3.कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका. कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात.
4.जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत वाईट वागली असेल, तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा नाहीतर पश्चाताप होईल.
5.काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध रहा.
6.जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे.
7.आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत.
8.आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो.
9.कधीही झाडासारखे आयुष्य जगू नका. कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात.
10.कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका. कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे, त्यांना सफाई देण्याची गरज नाही.आणि त्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमच पटणारच नाही.
11.कदर करा त्याची जे मनापासून तुमची काळजी घेतात. नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात.
12.आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांनाही माहित आहे की, आकाशात कायम थांबता येत नाही, शेवटी जमिनीवर यावेच लागणार आहे.
13.आपल्या यशाचा रुबाब आई-वडिलांसमोर करू नका. कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून, तुम्हाला जिंकवलं आहे.
14.फोटो काढायला एक सेकंद लागतो पण image बनवायला आयुष्य कमी पडतं, म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि image बनवण्यावर लक्ष द्या.
15.पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल.
16.लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुरक्षित बना.
17.जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते.
18.जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात.
19.जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल, तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
• सगळ्यांना आपण एकाच वेळ खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेव इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात.
• दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची.
• तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी "हो" म्हणण्याला बंद करा, "नाही" म्हणता आलं पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीकडून तुम्हाला आदर मिळवायचा असेल तर या 13 गोष्टी आवर्जून करा...! | selfrespect video व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लक वर क्लिक करा...
https://youtu.be/mgZLWkUymhM?si=W4iaXiM00wMJVIFR
20.लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात.
21.पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं. पण कानात गेलेली विष सगळीच नाती संपून टाकत असतं.
22.शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे? आणि कधी बोलायचं आहे?
23.कोणाची गरीबी पाहून नाती तोडू नका. कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो, तितका मान श्रीमंतांच्या घरी सुद्धा मिळत नाही.
24.शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण अशांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपवून टाकेल.
25.जोडीदार घरी बसला तरी चालेल पण चांगला असावा, आणि तुमचा आदर करणार असावा... कारण गरीबी हटवता येते, पण वाईट माणसांसोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते.


Comments
Post a Comment