या 5 गोष्टींना आपण घाबरून गरीब बनतो तर जाणून घ्या या 5 गोष्टी कोणत्या आहेत. तुमचं यश केवळ मेहनतीवर नाही, तर तुमच्या भीतींवरही अवलंबून असतं. होय, चुकीच्या भीतींनी तुमचं स्वप्न आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त करू शकतं. कधी विचार केलाय का, तुम्हालाही अशा पाच भीतींनी गरीब बनवलं आहे का? "तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही? तुमचं स्वप्न पूर्ण करायला अडथळा ठरते?" मेहनत करूनही कधी वाटलं आहे का की काहीतरी हातातून निसटतंय? काहीतरी आहे जे तुमचं यश रोखतंय? त्या पाच भीतींना ओळखून, त्यांचा सामना करणं महत्त्वाचं आहे. चला तर त्या पाच भीती कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात ! १. अपयशाचा भय (Failure Fear) - अपयशाची भीती ही अनेक लोकांच्या यशस्वी होण्याच्या प्रवासात सर्वात मोठा अडथळा असते. ही भीती मुळातूनच निर्माण होते, जेव्हा लोक अपयशाला अंतिम मानतात आणि त्यातून शिकण्याची संधी गमावतात. समाजात असे वातावरण तयार होते की अपयश म्हणजे अपमान किंवा कमीपणा. त्यामुळेच अनेक लोक स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करत नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पण ...