मकर संक्रांति 2025 :-महिलांनो मकर संक्रांतीला हे आवर्जून पाळात 13 नियम..











थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात्मा मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनु राशीतून मकर राशि प्रवेश करतात त्यांच्यामुळे या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते आणि दान देखील केली जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांति 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9.03 ते सायंकाळी 05.46 वाजेपर्यंत आहे. 


मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्म मुर्तावर स्थान करणे शुभ मानले जाते अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे अंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्य देवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्य देवाच्या मंत्रांचा जप करा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य (तिळाचे लाडू किंवा गुळ) इत्यादींचा नैवेदन करा. 


दरवर्षी मकर संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज असतो म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांति देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळे 2025 च्या मकर संक्रांति च्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत. 


शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. 


मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी आधी घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे की त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला. 


आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत. 


1. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये.


2. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांनी प्रेमाने बोलावे.


3. मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहात दारू कांदा लसूण यांचे सेवन करणे या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा.


4. या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंठा किंवा वादविवाद करणे घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात.


5. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते.


6. या दिवशी घराबाहेर असलेल्या गरजू व्यक्तींना मदत करावी त्यांचा अपमान करू नये.


7. त्यादिवशी काळे तीळ पांढरे तीळ गुळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते. 


मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे सादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबांची दुवाल आपल्याला मिळते.


8. मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते.


9. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल.


10. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते.


11. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील.


12. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते.


13. संक्रांतीला वाद म्हणून काय द्यावे संक्रांतीला वाण मधून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूंचे दान देऊ शकता वाहन खूप महाग असावं असं काहीच नाही. 


काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग बटवा मोबाईल पाऊच क्लचर सिंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्यप्रसाधने कुंकवाचा करंडा गृह उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाउज पीस शोची एखादी वस्तू पूजेचे ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टॅन्ड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाहन म्हणून देऊ शकता. 

Comments

Popular posts from this blog