बायकोचा राग आला तर काय करावे?
बायकांना मुलींना खूप बोलायची सवय असते. त्या खूप काही बोलतात. शेवटी काय बोलं हे त्याना सुद्धा कळत नाही. बायको आपल्यावर ओरडली की आपण शांत राहायचं. हो हो तुझं खरं आहे. माझंच चुकलं. आणि लगेच, तू खूपच छान दिसायलीस आज. माझ्यासाठी एवढी नको तयार होत जाऊ. मला तू बिना मेकअपचीच खूप आवडतेस, खरंच. असंच हळूहळू तिला दुसरीकडे बोलत बोलत नेत जा.
कारण बायका मुलींना रागपण खूप लवकर येतो. शांत ही तेवढ्याच लवकर होतात. त्यांचा त्रास म्हणजे ते काय आपल्या अंगावर तलवार घेऊन येत नाहीत. उगी टोचून बोलतात. लांब लचक हे ते सांगतात. आपण फक्त तिला बघत शांत ऐकायचं. मग हळूहळू तिचा राग शांत होईल. बायकांनिही थोडं आपल्या नवऱ्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यांना समजून घेतलं पाहिजे. बोलतानां काही बोला तो ऐकतोच. कारण तुमच्या एवढं त्याच्या जवळचं कोणीच नाही त्याला. आतून त्याच्या मनाला रडू यईल असं बोलू नका.
त्रास म्हणजे काय असतो. नको नको वाटणारी गोष्टी जास्तंच पुढं येऊ लागली, की मग त्यांचा त्रास आपल्याला दिसतो. आपण बायकांना समजलं पाहिजे. त्यांनाही नवऱ्याच्या भावना कळल्या पाहिजेत. त्याचं ही कधी ऐकत जा. एकतर पुरुष जास्तं बोलत नसतो. तुम्ही रोजच त्यांच्या मागे लागू लागलात,की कुणालाही त्रास होणारंच. किती ही शांत असला की मग तो चिडतोच.
पुरुषांनी थोडं बायकांना बाहेर नेत जा. ती जास्तंच काही तरी वेगळ बोलू लागली, की मग हिला बाहेर फिरवण्याची तारीख आली म्हणून समजा. बायका ह्या नवऱ्या समोरंच रिलॅक्स होतात. त्यांना खूप तुमच्याशी बोलावंस वाटतं. आपण कामात असतो. त्या मुळे वेळ देऊ शकत नाही. मग ह्या दिवसभर घरात बोर होतात. नवऱ्यासारखं आई-वडिलांना तिला खुलून मन मोकळं बोलणं होत नाही. ती आपलीच वाट बघते.
मग आपण थकून येतो. तिचं बोलणं थोडसं त्रास दायक वाटू लागतं. त्यावेळी आपण पण थोडं सहन करा. कामावरून आल्यावर ती जास्तंच उदास नाराज वाटली की तिला एकट्यात बोलवा. थकलेले केस मागे सारून दोन सेकंदाची छानशी कपाळावर किस घ्या. हात खोलून तिला हग करा. त्यावेळी तिचा दिवसभराचा सगळा ताण क्षणात कमी होईल. दिवस भर प्लॅन केलेले सांगण्यासाठी तिच्या डोक्यात काहीच रहाणार नाही. मग ती आपल्यासोबत गोडंच वागणार. कधीही बायका मुलींना त्रास म्हणून बघू नका. त्यांच्या जागी स्वतःला ठेवून
विचार करा.





Comments
Post a Comment