"आपला छळ सुरू आहे हे जाणवतंय, पण त्याविरुद्ध काहीही करता येत नाही, अशा स्थितीत काय करावे?"
"जगण्याच्या प्रवासात अनेक वेळा आपल्याला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, जिथे आपल्यावर अन्याय होतोय, छळ होतोय, हे स्पष्ट दिसतं, पण त्याविरुद्ध काही करण्याची ताकद, हिंमत किंवा मार्ग सापडत नाही. आपण स्वतःला अशा एका वर्तुळात अडकलेले अनुभवतो, जिथून बाहेर पडण्याचा प्रत्येक प्रयत्न फेल ठरतो. या वेळी मनात निराशा, अपयशाची भावना येते आणि आपला आत्मविश्वास देखील डगमगतो. पण अशा कठीण परिस्थितींचा सामना करायचा असेल, तर आपल्याला शांतपणे विचार करण्याची, योग्य निर्णय घेण्याची, आणि आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याची गरज असते. आज आपण या व्हिडिओतून अशा प्रसंगी काय करता येईल, आपल्याला स्वतःला कसे सक्षम करता येईल, आणि छळाच्या या भयंकर चक्रातून बाहेर पडून आयुष्यात पुढे कसे जायचे याबद्दल सविस्तर चर्चा करू."
1. राग आणि चिडचिड होते आणि आत्मविश्वास गमावण्याची भावना निर्माण होते- आपला छळ होतोय, हे जाणवणं ही अत्यंत वेदनादायक आणि अस्वस्थ करणारी भावना असते. अशा वेळी आपला राग अनावर होतो, चिडचिड होते आणि आपण स्वतःच्याच निर्णयक्षमतेवर शंका घेऊ लागतो. आपल्याला असं वाटतं की आपण ज्या परिस्थितीत अडकलो आहोत, त्यातून सुटण्यासाठी काहीच करू शकत नाही. या वेळी आपण स्वतःला दोष देतो, आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवत नाही, आणि आपल्या प्रयत्नांना अपयशी मानतो. यामुळे राग अधिकच तीव्र होतो, आणि तो राग आपल्या जवळच्या लोकांवर किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवर निघतो. ही चिडचिड आणि अस्वस्थता आपल्याला मानसिकदृष्ट्या खच्ची करते आणि आपला आत्मविश्वास गमावण्याची भावना निर्माण करते.
परंतु या वेळी महत्त्वाचं आहे की आपण स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भावना स्वाभाविक आहेत, पण त्या भावना आपल्या निर्णयक्षमतेवर प्रभाव टाकू देऊ नयेत. राग आणि चिडचिडीतून बाहेर येण्यासाठी, काही वेळ स्वतःसाठी घ्यावा, शांत बसून विचार करावा, आणि आपल्या भावनांना मोकळं करावं. आपली मनःस्थिती सुधारण्यासाठी मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबीयांशी बोलणं, शारीरिक व्यायाम करणं, किंवा ध्यानधारणा करणं यासारख्या सकारात्मक गोष्टींचा आधार घेता येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःला समजून घेणं आणि परिस्थितीवर काम करण्यासाठी हळूहळू योग्य उपाय शोधणं. हळूहळू, आत्मविश्वास परत येतो आणि आपण परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी सक्षम होतो.
2. स्वतःला दोष देणे दुखावलेली भावना निर्माण होणे - आपल्या आयुष्यात अशा अनेक वेळा येतात, जिथे आपण जे घडत आहे ते थांबवू शकत नाही, किंवा परिस्थितीला आपल्या अनुकूल वळण देऊ शकत नाही. अशा वेळी, आपण स्वतःलाच दोष देतो. "मी चुकलो, मी प्रयत्न कमी केले, कदाचित मी अधिक चांगलं करू शकलो असतो," असे विचार मनात येतात, आणि ही स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक खच्ची करते. आपण विचार करू लागतो की जर आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असता, तर परिस्थिती वेगळी असती. हे विचार आपल्या मनात दुखावलेली भावना निर्माण करतात. आपण स्वतःला कमी लेखतो, आपल्या कर्तृत्वावर शंका घेतो, आणि त्या भावनेत अडकून राहतो.
या भावनांमुळे आपलं मानसिक आरोग्य प्रभावित होतं, आत्मविश्वास कमी होतो, आणि आपल्याला निराशेच्या गर्तेत नेतो. परंतु, ही भावना तात्पुरती आहे आणि यावर काम करता येतं. स्वतःला दोष देण्याऐवजी, आपण परिस्थितीचा अभ्यास करून त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की प्रत्येक चूक किंवा अडचण ही शिकण्यासाठीची संधी असते. त्यातून आपण भविष्यासाठी अधिक चांगल्या निर्णयांची तयारी करू शकतो. स्वतःला क्षमा करणे आणि पुढे जाण्याचा विचार करणे हेच या भावनांवर विजय मिळवण्याचं खरं साधन आहे.
3. असाहाय्यता आणि हदबलता येते- असायता आणि हतबलता या दोन भावना आपल्या मनाला खोलवर प्रभावित करतात. विशेषतः अशा परिस्थितीत, जिथे आपण समस्या समजून घेऊ शकतो, त्यातून होणाऱ्या परिणामांची जाणीव होऊ शकते, पण त्यावर काहीही उपाय शोधू शकत नाही, तेव्हा या भावना अधिक तीव्र होतात. असायता म्हणजे आपण काहीच करू शकत नाही अशी स्थिती; एखाद्या समस्येचा मार्ग सापडत नाही किंवा परिस्थितीवर आपले नियंत्रण नसल्याची भावना. हतबलता ही त्याचाच पुढचा टप्पा, जिथे आपले प्रयत्नही फेल ठरल्यासारखे वाटतात आणि निराशा मनात भरते. अशावेळी मनावर ताण येतो, आत्मविश्वास कमी होतो, आणि जीवन नीरस वाटू लागते. आपले निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होते, आणि आपण स्वतःच स्वतःला दोष देत राहतो. पण ही स्थिती तात्पुरती आहे, हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या मनाला शांत ठेवून आणि योग्य दृष्टिकोनाने विचार केला तर या भावनांवर विजय मिळवता येतो. असायता आणि हतबलता येणं हे मानवी जीवनाचा भाग आहे, पण त्या भावनांमध्ये अडकून राहणं योग्य नाही. त्यावर उपाय शोधणे आणि जीवनाला नवा दृष्टिकोन देणे हाच खरा मार्ग आहे.
4. भीती आणि असुरक्षितता, निर्णय घेण्यात असमर्थता जाणवू लागते- छळामुळे आपल्याला कोणतेही निर्णय घ्यायला भीती वाटू लागते माझ्याकडून काहीतरी चूक होईल मी हे करू शकणार नाही असे वाटू लागते या भीतीने आपण चुकीच्या गोष्टी स्वीकारू लागतो माझी परिस्थिती अजूनच बिघडले का त्यातून सुटण्याचा काही मार्ग आहे का हे विचार मनात रुंजी घालू लागतात अशावेळी सर्वप्रथम भीतीला दूर सारा कोणी माझं काही बिघडवू शकत नाही मी खूप स्ट्रॉंग आहे स्वतःसाठी लढू शकतो हे स्वतःला ठामपणे सांगा थोडा वेळ स्वतःसाठी घ्या शांत मनाने विचार करा की तुम्हाला पुढे काय हवे आहे आणि तुमच्यासाठी योग्य तो निर्णय घ्या खूपच त्रास होत असेल तर सरळ कायदेशीर सल्ला घ्या.
5. एक वेळ अशी येते की आपण मूकपणे फक्त छळ सहन करीत असतो- अनेक स्त्रिया खेळामुळे गप्प राहतात कारण त्यांना वाटते विरोध केल्यास परिस्थिती आणखीन बिघडेल अशावेळी छळ करणाऱ्याला चेव येतो त्याला वाटतं समोरची व्यक्ती सहन करत न, मग मी अजून त्रास देणार मित्रांनो गप्प बसणे योग्य पद्धतीने विरोध करायला शिका कायद्याचा आधार घ्या आणि योग्य व्यक्तींशी संपर्क साधा छळ करणारा जेवढा दोषी असतो ना तेवढा सहन करणार करणारा ही असतो हे लक्षात घ्या.
6. एकटेपणा आणि समाजाचा दबाव जाणवणे- आपल्याला असं वाटते की आपल्या समस्यांना कोणीही महत्त्व देत नाही मला चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे माझा ऐकायला कोणी तयार नाही माझ्या समस्यांना कोणतीच किंमत नाही असे वाटून मानसिक थकवा निराशा आणि कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नाही असं वाटतं की सगळे डोळे काढून तुमच्याकडेच बघत आहे अशावेळी समाजापेक्षा स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य द्या तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा विश्वासू मित्र किंवा कुटुंबीयांशी बोला तुमच्या भावनांना व्यक्त करा नवे लोक जोडण्यासाठी प्रयत्न करा कधी कधी वेगळ्या व्यक्तींचा दृष्टिकोन तुमचं मन हलकं करतो.
7. आरोग्यावर परिणाम होऊ लागतो- सततच्या छळामुळे स्त्री-पुरुष दोघांच्याही मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. झोप न लागणे ताण वाढणे ही लक्षणे दिसू लागतात घरात मित्र मंडळी हे लोक गप्प गप्प राहू लागतात चेहरा सतत उदास दिसतो मोकळेपणाने हसणं बंद होतं अशावेळी माणूस डिप्रेशनमध्येही जाऊ शकतो मित्रांनो नियमित ध्यान करा चालणे किंवा हलका व्यायाम करा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या उत्तम छंद जोकासा आणि त्या निरर्थक व्यक्तींचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाका.
8. भावनिक बंध तोडले जाणे- जर करणाऱ्या व्यक्तीमुळे नात्यात संबंधात पुरावा निर्माण होतो आणि ती व्यक्ती स्वतःला एकटी समजू लागते एवढं साहजिकच आहे एकट वाटणं मनशांती बिघडणं हे सार पिच्छा पुरवतं. पण अशावेळी छळाच्या मूळ कारणावर लक्ष केंद्रित करा शांतपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडा. माझा छळ करणं थांबवा अशी स्पष्ट मागणी करा तरच छळ करणाऱ्याला त्याची मर्यादा कळेल आपली ऊर्जा सकारात्मक लोकांमध्ये घालवा नवीन मित्र जोडा नकारात्मक लोकांपासून जितके दूर राहताय तितके दूर राहा यात प्रश्न हा असतो किती नकारात्मक व्यक्ती घरातील माणूस असते आणि अनेक कारणामुळे आपण त्यांना सोडू शकत नाही अशावेळी तुम्ही त्या व्यक्तीशी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यासाठी एखादं छोटं का होईना ध्येय ठेवा त्या ध्येयाला पाहून तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल त्या नकारात्मक व्यक्तीला पाहून त्याच्याकडे लक्ष देऊन शून्य उपयोग आहे त्यापेक्षा स्वतःसाठी काही करता येते का पहा लक्षात ठेवा मोठं व्हायचं असेल तर छोट्या पासूनच सुरुवात करावी लागते.
9. कामावर परिणाम होतो- छळामुळे आपल्याला कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते आपण सतत त्याच विचारात असतो काय चूक झाली सारखं असं माझ्याबरोबर का होतं समोर रस्ता दिसत नाही असं वाटत राहतं पण छळ होत असताना शांत राहणं हे प्रथम आवश्यक आहे भावनांचा विस्फोट होण्याऐवजी परिस्थितीवर विचार करण्यासाठी वेळ द्या खोल स्वास घेणे आणि मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा माझ्यामुळे असं झालं असा विचार करणे सर्वप्रथम सोडा पुस्तक वाचा सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. छळाचा विचार कामाच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका जरी तिकडे ती व्यक्ती असेल तरी जास्तीत जास्त तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा.
10. बदला घेण्याची भावना सतत मनात येत राहते- सततच्या छळामुळे आपल्या मनात बदला घेण्याची भावना येऊ शकते ती व्यक्ती समोर आली की खाऊ की गेलो असे वाटत राहते बरीच लोकं तर असंही म्हणतात की स्वप्नात मी त्या व्यक्तीला खूप मार देतो जितका राग आहेत तितकं स्वप्नात मी त्याच्याशी वाईट वागतो मित्रांनो बदला घेण्याऐवजी शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा नाहीतर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक राहील शांत रहा आणि विचारपूर्वक कृती करा मित्रांनो छळ हा कोणत्याही प्रकारचा असो तो सहन करणं चुकीचा आहे छळाला तोंड देणं सोपं नाही तर त्या प्रत्येक प्रसंगातून शिकता येतं संयम आत्मविश्वास आणि योग्य कृती हीच अशा ठिकाणी परिस्थितीतली शस्त्र आहे कोणत्याही परिस्थितीत मूकपणे छळ सहन करू नका भावनांना व्यक्त करण्यासाठी स्वतःला वाचा द्या योग्य वेळी मदत करणं कमजोरी नाही तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी घेतलेली पहिली पायरी आहे आयुष्य तुम्हाला अशा प्रसंगांमधूनही शिकवत असतं आणि आपण त्यातून अधिक सक्षम बनतो तुम्ही तुमचं सत्व ओळखा आणि छळासमोर कधीही स्वतःला झोपू देऊ नका जीवनात कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणं टाळा आणि स्वतःच्या सुखासाठी ठामपणे उभे रहा.
मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमंडळी सोबत शेअर करा अशाच नवीन मोटिवेशन स्टोरीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा
धन्यवाद 🙏
.

Comments
Post a Comment