Kitchen tips:- टॉपर गृहिणी होण्यासाठी या 37 टिप्स फॉलो करा.
1. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडूलिंबाची पाने खा, तसेच कधीही तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्र खाऊ नका; तसेच आंबट फळे खाणे टाळा.
2. जर तुमचा माता ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे.
3. पोटातील सर्व घाण साफ होऊन चेहऱ्यावर नैसर्गिक रित्या चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा कडूलिंबाचा रस आवर्जून प्यावे.
4. जर एखाद्याचे बीपी कमी असेल आणि त्याला चक्कर येते, तसेच अशक्तपणा वाटत असेल, हात-पाय थरथर कापत असतील, त्याला लगेच साखर आणि मीठ मिक्स करून द्या.
5. फाटलेल्या टाचा मुळे हैराण असाल तर रात्री कोमट पाण्याने पाय धुतल्यानंतर ते चांगले कोरडे होऊ द्या. त्यानंतर तळव्यांवर हलके कोमट खोबरेल तेल लावून मसाज करा, त्यावर सुती मोजे घाला आणि झोपा. सकाळी त्यांना साध्या पाण्याने धुवा.
6. चाळीशी नंतर देखील आपले सांधे आणि पाय उत्तम मजबूत राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज एक ग्लास दुधाचा समावेश करावा. दूध पिल्याने हाडांचे कॅल्शियम टिकून राहते.
7. एखाद्याला दम्याचा त्रास होत असेल तर दालचिनी दुधात उकळून घ्यावे. त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व घशातील कफ कमी होण्यास मदत होते.
8. ताकात एक चमचा ओवा पावडर टाकून त्याचे सेवन केल्याने मूळव्याध कमी व्हायला मदत होते.
9. ज्या स्त्रियांना सतत सर्दीचा व डोकेदुखीचा त्रास होत असतो, त्यांनी एसीच्या किंवा फॅनच्या हवेपासून दूर राहावे आणि फ्रीजचे थंड पाणी पिऊ नये. फ्रीजमधील पाणी पिल्याने शरीरात वात निर्माण होऊन पोटाची चरबी देखील वाढते.
10. बीटामध्ये फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी बीट अत्यंत उपयुक्त असते. याशिवाय नैसर्गिक प्रसूतीनंतर बीटामुळे आईचे दूध देखील वाढण्यास मदत होते.
11. फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही मठातील पाणी प्या. फ्रिजमधील थंड पाणी शरीरासाठी खूप हानिकारक असते.
12. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये. त्यामुळे छातीत दुखू लागते. त्यासाठी पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे. त्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते, आणि जर तुम्ही उभे राहून पाणी पिले तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो.
13. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका, तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. प्रत्येक पदार्थांमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. ते शरीरासाठी फायदेशीर आहे.
14. जर तुम्ही रोज पाण्याचे प्रमाण कमी केले तर ओठ काळे पडतात.
15. बीट खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील व्हाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, व आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा वाढण्यास मदत होते.
16. जर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर रोज बडीशेप खा. यामुळे केस गळती लवकर थांबेल.
17. दीर्घकाळ टीव्हीकडे झुकून पाहिल्यास पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
18. ज्या स्त्रियांना त्यांची कंबर छान सर पातळ करायची आहे, त्यांनी रोज ग्रीन टी, ब्लॅक टी व लेमन टी प्यावी. यामुळे आपले वजन कमी होते.
19. महिलांनी शरीरासोबत आपल्या त्वचेची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. आपले सौंदर्य आणि फिटनेस हीच आपली प्राथमिक ओळख असते, आणि त्यानेच आपण चारचौघात आकर्षित व उठून दिसतो.
20. महिलांनी कधी छोट्या-मोठ्या दुखण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण काही वेळा ही दुखणी मोठ्या आजारांचे रूप घेऊ शकतात. म्हणून दुखण्याकडे योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करून घ्यावा.
21. चहाच्या सेवनामुळे गॅस, एसिडिटी, आणि हाय ब्लडप्रेशर यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. चहा कमी प्रमाणात प्यावा.
22. अक्रोड आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे आहेत. रात्रभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड सकाळी खाल्ल्याने सांध्यांची मजबुती टिकून राहते.
23. केसांची जर लांबी वाढवायची असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावे. नाहीतर तसेच कोरडे केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि जास्त गळू लागतात.
24. हात किंवा पाय मुरगळला असेल तर बर्फाच्या तुकड्यांनी मसाज करा. त्यामुळे आराम मिळतो. तसेच हात किंवा पाय सुजले असतील तर रगडून कधीही चोळू नये; नेहमी हलक्या हाताने मसाज करावे.
25. पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असल्यास दालचिनी चघळा. फरक जाणवेल.
26. जर तुमची त्वचा हिवाळ्यात कोरडी शुल्क पडत असेल तर नेहमी झोपताना बॉडी लोशन लावून झोपा.
27. लघवीच्या जागी खाज येत असल्यास त्या जागेवर खोबरेल तेल लावावे. फरक जाणवेल.
28. रोज कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरीरात रक्त वाढते.
29. जास्त थंड पाणी पिल्यामुळे दात लवकर खराब होतात.
30. डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने हलके मालिश करून झोपा. लवकर फरक जाणवेल.
31. स्त्रियांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट शेकवा. याने वेदना कमी होतात.
32. दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन जरूर करा. तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल.
33. पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. महिनाभर असे केल्यास पोटाची चरबी कमी होते.
34. केस खूप विरळ होत चालले असतील तर केसांसाठी एक ग्रॅम भीमसेन कापूर बारीक पावडर करून त्यामध्ये खोबरेल तेल कोमट करून टाका. या तेलाने केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळाशी मालिश करा. 30 मिनिटांनंतर केस धुवा. आठवड्यातून दोन वेळा केल्याने केसांच्या समस्या दूर होतात.
35. डोक्यात जास्त कोंडा होत असेल तर दह्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करून अंघोळीपूर्वी केसांना लावा. कोंडा दूर होईल.
36. खोकला जास्त येत असेल तर मधात हळद आणि सुंठ पावडर किंवा आल्याचा रस घालून घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.
37. पोटात सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोंडी डाळिंब खा. सूज दूर होईल.

Comments
Post a Comment