टॉपर सुगरण होण्यासाठी खास किचन टिप्स 👩🍳 | kitchen tips | cooking tips | tips | kitchen tips and tricks 💯
1. कोणत्याही पदार्थात तेल जास्त झाले असेल तर ते तेल काढण्यासाठी बर्फाचा गोळा घेऊन जास्त तेल झालेल्या पदार्थात बुडवा आणि बाहेर काढा. तेलाचा पूर्ण कट बर्फाच्या गोळ्या सोबत बाहेर येईल.
2. मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास कणकेला वरून तूप लावून कणिक फ्रिजमध्ये ठेवावी. कणीक ताजी राहते व कणीक काळीही पडत नाही.
3. लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साल पटकन निघते.
4. सुके खोबरे तूर डाळीत ठेवले तर ते खराब होत नाही.
5. डाळ शिजवताना त्यात हळद पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण छान येतो.
6. दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंद आचेवर तापवा. दूध तापवलं की अर्धवट झाकून ठेवा आणि कोमट झालं की ते फ्रीजमध्ये चार-पाच तास ठेवा. यामुळे साईचा थर अजून जाड होतो.
7. बटाटे पटकन उघडण्याकरिता बटाट्यांमध्ये चिमूटभर हळद घालावी. बटाटे झटपट उकडतात.
8. खीर बनवताना त्यामध्ये दोन चमचे रवा भाजून टाकावा. त्यामुळे खीर खूप छान दाटसर बनते व चवीला सुद्धा छान लागते.
9. अननसाचा शिरा करताना त्याची तुकडे साखरेत भिजवून मग शिऱ्यात घाला. यामुळे आंबटपणा येत नाही.
10. साबुदाणा खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात दोन चमचे दूध घालावे.
11. गाजर टमाटर मुळा काकडी आणि बीट मऊ किंवा शिळे झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात. सकाळी ताज्या टवटवीत होतात.
12. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा. म्हणजे डाग पटकन निघून जातात.
13. टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाका. टोमॅटो आपोआप कडक होतील.
14. बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी. म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही.
15. आप्पे करताना आप्प्याच्या पिठात अंडी घातल्यास अबे टम्म फुगतात आणि अप्पे पात्राला चिकटत नाहीत.
16. हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जाण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावे.
17. भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढून नयेत. सालासकट कुट करावे. सालात अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात जे हृदयासाठी चांगले असतात.
18. डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला कीड लागत नाही.
19. मिसळपाव करताना फोडणीनंतर मिसळच्या रस्स्यावर तर्री आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर (चिमटभर) घातली. की रस्स्यालातेलाचा तवंग येतो.
20. इडली डोसा आणि अप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळीसोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवावा. यामुळे पोषणमूल्य वाढते.
21. इडलीच्या पिठामध्ये दहा मिनिटे पोहे भिजवून वाटून घातल्यास इडल्या छान मऊसूत लुसलुशीत नरम होतात.
22. पुऱ्या करताना पिठात दोन चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चांगली चवही येते.
23. ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरे ऐवजी साखरेचे पाणी घालावे. म्हणजे ढोकळा छान नरम स्पंजी होतो.
24. चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो.
25. जर तुम्हाला नारळाची समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे. नारळ तेथूनच तुटेल.
26. कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात. तसेच रंग चांगला येतो.
27. कपड्यांवरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी. ती पूर्ण सुकू द्यावी त्यानंतर ते कापड स्वच्छ धुवावे.
28. एखाद्या कपड्याला चिंगम चिटकले असेल तर ते कापड एक तास फ्रिजमध्ये ठेवावे. त्यानंतर चिटकलेले चिंगम हाताने काढावे.
29. पांढरी कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा. त्यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते.
30. आरसा स्वच्छ करण्यासाठी कापसावर स्प्राईट घेऊन त्यांनी आरसा पुसावा. यामुळे आरसा स्वच्छ होतो.
31. पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा अडवा ठेवा. उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही.
32. घरच्या सगळ्या कोपऱ्यात बेकिंग ऍसिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुरळे येणार नाहीत.
33. मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राईंड करावे.
34. घरात किंवा स्वयंपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाणी नाहीशा होतात.
35. तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्यांच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला. यामुळे उंदीर येणे बंद होईल.

Comments
Post a Comment