🍽️💯महत्वाच्या टिप्स | Kitchen Tips| kitchen hacks #kitchentips #cookingtips #Marathikitchentips
1. भाजी करताना चमचा गॅसवर किंवा ओट्यावर ठेवू नका, त्यामुळे डाग पडतात व ते स्वच्छ करायला वेळ लागतो. त्याऐवजी चमचा प्लेटमध्ये ठेवा, म्हणजे किचन स्वच्छ राहील.
2. छोले किंवा वाटाण्याची भाजी घट्ट आणि दाटसर करण्यासाठी थोडे छोले किंवा वाटाणे मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट भाजीत घालावी. यामुळे भाजी घट्ट होते आणि चवही वाढते.
3. गोठलेला मध पातळ करण्यासाठी मधाची बाटली गरम पाण्यात काही वेळ ठेवावी. यामुळे मध सहज पातळ होतो.
4. फरशी पुसण्यासाठी पाण्यात कधी कधी बेकिंग सोडा घालून पुसल्यास फरशा स्वच्छ आणि चमकदार दिसतात.
5. वांगांच्या डागांसाठी दही अतिशय उपयुक्त ठरते. दह्यामध्ये थोडी हळद टाकून त्या मिश्रणाने वांग असलेल्या जागेवर मसाज करा. दहा ते पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.
6. सोयाबीन पटकन शिजवण्यासाठी थोडेसे गरम पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि सोयाबीन भिजवावे. यामुळे सोयाबीन आळणी लागत नाही आणि लवकर मऊ होते.
7. डाळ नीट शिजली नसेल तर ती मिक्सरमधून फिरवावी, यामुळे डाळ एकजीव होते आणि वरण छान लागते.
8. चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा घालून गाळणी 3-4 तास भिजत ठेवा. नंतर ब्रशने घासून धुवा, गाळणी चमकदार होईल.
9. दोडक्याची भाजी करताना साल फेकू नका, त्या साली तव्यावर परतून चटणी बनवा. ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप चविष्ट लागते.
10. लोकरीचे कपडे धुतताना अनेकजण गरम पाणी वापरतात, पण गरम पाण्यामुळे कपडे लवकर सैर पडतात. त्यामुळे स्वेटर आणि जॅकेट धुण्यासाठी नेहमी थंड पाणी वापरा.
11. लोकरीचे कपडे इतर कपड्यांप्रमाणे भिजत घालू नका, कारण पाण्यात जास्त वेळ राहिल्यामुळे ते खराब होऊ शकतात. लोकरीचे कपडे धुण्यासाठी हार्ड डिटर्जंट किंवा शाम्पूचा वापर करा, हे अधिक चांगले असते.
12. लोकरीचे कपडे नेहमी उलटे धरून धुवा आणि त्यांना जास्त घासू नका. ते दोरीवर थेट वाळत घालण्यापेक्षा हँगरला लावून दोरीवर लटकवून वाळू द्या. यामुळे कपड्यांचा आकार बिघडत नाही.
13. चांदीचं पैंजण किंवा चांदीची भांडी काळी पडल्यास, त्यावर केळीची साल घासल्यास चांदी चमकदार होते.
14. एक्झॉट फॅन स्वच्छ करण्यासाठी इनो आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पॅनवर लावून पंधरा मिनिटांनी स्क्रबरने घासा. यामुळे पॅन स्वच्छ आणि चमकदार होईल.
15. पोहे करताना फोडणीमध्ये थोडासा हिंग टाका, यामुळे पोहे चवदार होतात आणि पचनही सुधारते. पोहे खाताना लिंबू पिळून खाल्ले तर ऍसिडिटीची समस्या होणार नाही.
16. भटूरे बनवताना पिठात रवा किंवा कणीक न घालता अर्धा किलो मैदा, पाव किलो आंबट दही, 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 उकडलेला बटाटा मॅश करून घालून पिठ भिजवावे. हे पिठ 7-8 तास भिजवून ठेवल्यास भटूरे छान होतात.
17. केसांची चांगली वाढ होण्यासाठी, अर्धा ग्लास पाण्यात ग्रीन टी आणि एलोवेरा जेलचे चार ते पाच थेंब टाकून मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे नियमितपणे वापरल्यास केस गळती कमी होते.
18. घरात कोणी दारू पीत असेल किंवा दारू पिण्याची इच्छा होत असेल, तर एक चमचाभर मधात आल्याचा रस किंवा सुंठ पावडर मिसळून दिल्यास दारू पिण्याची सवय हळूहळू सुटू शकते.
तर या होत्या काही सोप्या आणि प्रभावी टिप्स, ज्यामुळे आपलं किचन आणि घर नेहमी स्वच्छ आणि ताजं राहील. जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील, तर कृपया व्हिडिओला लाइक करा, शेअर करा
आणि चॅनेलला सब्सक्राइब करा. धन्यवाद 🙏

Comments
Post a Comment