आयुष्यात कधी "माणूस इतका खालच्या थराला जाऊ शकतो" असा अनुभव आला आहे का?

सुचना : हे उत्तर तरुण मुलींसाठी सावधानतेचा इशारा असू शकते.










होय, मागिल काही दिवसांपूर्वी हा अनुभव माझ्या एका मैत्रीणीला आला. मला समजल्यावर असे वाटले की, बापरे ! माणुस इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो.


झाले असे की, माझ्या ओळखीची एक मुलगी आहे. तिला तिच्याही पेक्षा 3/4 वर्षाने लहान असलेल्या एका मुलाशी ओळख झाली. त्याला सख्खी बहीण नव्हती. त्यामुळे तो तिला म्हणाला की, मला बहिण असावी अशी खूप इच्छा होती पण दुर्देवाने बहिण नाही. तू माझी बहिण होशील का? तो हेच वाक्य तिच्यासारख्या अनेक मुलींना आधी पण बोलला होता.


बायकोचा राग आला तर काय करावे?

https://mankaumotivational.blogspot.com/2024/11/blog-post_21.html



तिने विचारपूर्वक सांगितले की" हो, चालेल, मला तुझी बहिण मान." मग एकदा तो तिला म्हणाला की, तुझे कुरळे केस, डोळे, नाक किती सुंदर आहेत! कोणीही सहज घायाळ होईल… त्याला कदाचित तिची भरभरुन स्तुती करायची असेल, पण ते तिला अजिबात आवडले नाही. खरे तर भावाने आपल्या बहिणीची अशी स्तुती केलेली मी पण पहिल्यांदा ऐकले. एक दिवस तर तो तिला म्हणाला, " तू माझ्याशी xxx विषयवार बोललीस तर मला फार आवडेल."


धोकेबाज व्यक्तींची 10 लक्षणे या लक्षणावरून धोकेबाज माणसांना ओळखायला शिका...

https://mankaumotivational.blogspot.com/2024/11/10.html


त्याला असे बोलायला जिवाला जराही लाज वाटली नसेल का?


बापरे! मला मोठा प्रश्न पडला, हा मुलगा तिचाच नाही तर जगातल्या कोणत्याही मुलीचा मानस भाऊ म्हणवून घेण्याच्या पात्रतेचा आहे काय?? कोणता भाऊ आपल्या मानस बहिणीशी अशा विषयवार बोलतो? त्याला जर सख्खी बहीण असती तर तिच्याशी या विषयावर बोलला असता का?? एखाद्या व्यक्तीला काही बोलण्यात निश्चितच खूप आनंद वाटत असेल, अगदी स्वर्गीय आनंद प्राप्त होत असेल, पण त्या गोष्टीचा उद्गार कोणापुढे करावा हे सुद्धा त्या सुशिक्षित व्यक्तीला समजू नये का?


पण तिला आधीच कळून चुकले होते की, हा भाऊ म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही.


मी अजिबात म्हणणार नाही/म्हणत नाही की पुरुष वाईट असतात. पुरुष वाईट नसतात मात्र, एखादा असा खालच्या थराला जाणारा असतो.असे वासनांध वासनेने भरलेले वासू आपल्या आजुबाजूला निरागसतेचा मुखवटा घेऊन फिरत असतात. त्यांच्या नसानसात वासुपणा संचारत असतो. हो, जसा चांगूलपणा, वाईटपणा असतो तसा वासनांध व्यक्तीत हा वासूपणा भरलेला असतो. पण प्रसंगी काहींचा दिसतो तर काहींचा दिसत नाही. अशा प्रकारची मानसिक विकृती असणारे माणसं कधीही खालच्या थराला जाऊ शकतात, त्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही, कारण बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे मर्म त्यांना कधीच कळत नाही. नावापुढे एखादी डिग्री लागली म्हणजे माणुस खर्या अर्थी सुशिक्षित झाला असे कधीच होत नाही, असे मी मानते. कारण खूप शिकुनही जर एखादी व्यक्ती खालच्या थराला जाऊन वागत, बोलत असेल तर मग मी, म्हणेल " व्यर्थ हो व्यर्थ! अशा माणसाचं सगळं जीवनच व्यर्थ."


मुलीच्या आयुष्याचा जोडीदार निवडताना एवढ्या अपेक्षा पण तुमच्या मुलीला ते नाही जमत..! 

स्त्रिया बरबाद होण्याची सात कारणे..

https://mankaumotivational.blogspot.com/2024/02/blog-post.html


अशी विकृती मैत्री करण्याच्या योग्यतेचीही नसते. कारण, निखळ, निर्मळ, पवित्र अशी विशेषणं त्यांच्या शब्द्कोशात कुठेच नसतात. तेव्हा मुलींनो, अशी खालच्या थराला जाणारी माणसे वेळीच ओळखा. आणि दुर रहा त्यांच्यापासुन. काळजी घ्या…


धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog